Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी शॉर्टसर्किट आग

परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire: परभणी तालुक्यातील वांगी येथील एका शिवारातील आखाड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमुळे जळलेल्या ठिंगांमुळे आखाड्याला आग लागली.


परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire |

परभणी (Parbhani short circuit fire) : तालुक्यातील वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्याला आग लागली सोसाट्याचा वारा सुरू असताना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये स्पार्किंग झाले.त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे शेतातील आखाड्याला आग लागली असल्याची माहिती अशोक गंगाधर गलांडे यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना दिली आहे.

परभणी तालुक्यातील वांगी येथील शिवारात विश्वनाथ काशिनाथ शिंदे यांचा अखाडा असुन यांची शेती सध्या अशोक गंगाधर गलांडे यांनी बटईने केली आहे.वार शनिवार 30 मे रोजी रात्री अंदाजे बाराच्या सुमारास महावितरणच्या तारांमधे शॉर्टसर्किट होऊन आखाड्याजवळ असलेल्या (Parbhani short circuit fire) कडब्याच्या गंजीला आग लागुन सुसाट वाऱ्याच्या वेगाने आखाड्याला आग लागली या आगीचा धूर व ज्वाला दिसताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अशोक गलांडे यांना माहिती दिली असता घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी असलेल्या शेतकऱ्यांनी आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रौद्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही क्षणांत संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या (Parbhani short circuit fire) आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीच्या लोळाने आखाड्यातील खरीप पेरणी साठी आणलेले खत बियाणे, ज्वारी 15 कट्टे, हरबरा 40 कट्टे जनावरांचेखाद्य,कडबा.गुळी,फिंकलर, नौजल,पाईप,वायर बंडल,पेंड,फवारणी यंत्र, पत्रांचे शेड, ताडपत्री,व इतर साहित्य जळाले असल्याची माहिती अशोक गलांडे यांनी दैनिक देशोन्नती शी बोलताना सांगितले आहे.प्रशासनाकडू नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related to this topic: