Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

सरपंच पोटनिवडणूक

परभणीतील कुपटा येथे सरपंच पदासाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर

Sarpanch by-election: परभणीतील कुपटा गावात सरपंच पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव जागेसाठी पोट निवडणूक संपन्न होणार, मतदान 28 एप्रिलला.


परभणीतील कुपटा येथे सरपंच पदासाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर

Sarpanch by-election |

अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव

२८ एप्रिल रोजी होणार मतदान ; २९ एप्रिलला निकाल

परभणी (Sarpanch by-election) : सेलू  तालुक्यातील कुपटा येथील सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला पदासाठी राखीव सुटले असता जनतेतुन सरपंच पदी रुक्मीणी गवळे तर तिन प्रभागातुन प्रत्येकी ३ सदस्य असे ९ सदस्य यांना बसवले मात्र  दोन ते अडीच वर्षे होताच ९ सदस्यांनी त्यांच्यावर विविध आरोप करत अविश्वास ठराव दाखल केला. गावात विशेष सभेचे आयोजन करुन मतदान घेतले. सरपंच यांच्या वरील अविश्वासाच्या बाजुने बहुमताने मतदान झाले. त्यामुळे सरपंच रुक्मिणी गवळे यांचे पद गेले. त्यानंतर उपसरपंच रूख्मांगत सोळंके यांच्याकडे पुढील काळासाठी कारभार देण्यात आला होता. मात्र आता सरपंच पदासाठी (Sarpanch by-election) पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

कुपटा येथे जनतेतुन थेट पुन्हा सरपंच निवडला जाणार आहे. अनुसूचित जाती महिला पदासाठी जागा राखीव असुन निवडणूकीसाठी विस्तार अधिकारी पंचायत समिती सेलू अमोल माटकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर झाला आहे. नामनिदेशनपत्रे उमेदवारांकडून किंवा त्याच्या प्रतिनिधीमार्फत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे ७ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ (शनिवार ११ एप्रिल व  रविवार १२एप्रिल वगळून) तहसील कार्यालय सेलू येथे स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन पद्धतीने पूर्णपणे भरलेली नामनिर्देशनपत्राची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून स्विकारण्यात येईल.

तहसील कार्यालय सेलू येथे १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची नोटीस उमेदवारांकडून किंवा त्याने लेखी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत  स्वीकारण्यात येतील. तसेच (Sarpanch by-election) निवडणूक चिन्ह देण्याचा व अंतिम निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार असून मतमोजणी व निकाल  २९ एप्रिल रोजी घोषित केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख ६मे आहे.

Related to this topic: