Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पीडीसी बँक

पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank: सहकारी बँकेतच्या उपाध्यक्षपदी गेल्या भव्यांवर नाविने अच्याः रामप्रसाद कदम आणि उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा पाटील राझेश यांची बिनविरोध निवड झाली.


पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank |

 

भैय्या पाटील गोरेगावकर यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी वर्णी

हिंगोली (PDC Bank) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया ३ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ११ वाजता परभणी येथील शेतकरी भवन या सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस. पी. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. 

अध्यक्ष पदासाठी माजी आमदार रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर आणि सौ. भावना सचिन मुंगसे बोर्डीकर यांचे असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवड प्रक्रियेदरम्यान सौ. भावना सचिन मुंगसे बोर्डीकर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे केवळ एकच वैध अर्ज शिल्लक राहिल्याने रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी काकडे यांनी घोषित केले. उपाध्यक्ष पदासाठी देखील दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये आमदार खान सईद शेरगुल खान आणि पाटील राजेश साहेबराव यांचा समावेश होता. यापैकी खान सईद शेरगुल खान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाटील राजेश साहेबराव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम. यु. यादव आणि बी. एस. नांदापूरकर यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच निवडणूक कक्षातील सचिन लोणीकर, डी. जी. पठाण आणि गोविंद कदम यांनीही निवड कामकाजात सहकार्य केले. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यासी अधिकारी एस. पी. काकडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्ष  पाटील भैय्या उर्फ राजेश साहेबराव पाटील गोरेगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुरुंदकर तसेच बँकेचे अधिकारी माळवटकर उपस्थित होते.