Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी कार्यालय आग

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला आग

Parbhani office Fire: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार योजलेल्या ब्लॉक ऑफिस (बीएलओ) बैठकीत अचानक आग लागली. बाथरूम परिसरातील आग खाक झाल्याने सभागृहाचा मागचा भाग जळून


परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाला आग

Parbhani office Fire |

 

बीएलओ बैठकीदरम्यान उडाली धावपळ; सुदैवाने जीवितहानी टळली

परभणी (Parbhani office Fire) : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवार २५ जून रोजी दुपारी बीएलओची बैठक सुरू असतानाच अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सभागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम परिसरात लागलेल्या आगीत काही भाग जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएलओची बैठक दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रानंतर दुपारी अंदाजे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास सभागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम परिसरात अचानक आग लागली. आगीचे कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नसले तरी विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचे काम हाती घेतले. आगीत नियोजन सभागृहाच्या मागील बाजूचा काही भाग जळून खाक झाला. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, (Parbhani office Fire) आगीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला. प्रशासनाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. घटनेची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी अन्य कामानिमित्त मुख्यालयाबाहेर असल्याची माहिती मिळाली. मात्र, या घटनेबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी माध्यमांना अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आगीच्या नेमक्या कारणाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.