Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी मजुर मृत्यू

परभणीत रोहीला दुचाकीची धडक; मजुराचा मृत्यू...!

Parbhani Laborer Death: रोहीच्या धडकाने बोरीतील एक मजूराचा अपघात; तो गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला. उपचारानंतर अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबास आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.


परभणीत रोहीला दुचाकीची धडक मजुराचा मृत्यू

Parbhani Laborer Death |

 

बोरी-वालूर रोडवरील नागठाणा पाटी जवळ सोमवारी सकाळी अपघात..!

परभणी (Parbhani Laborer Death) : जिंतूर तालुक्यातील बोरी  येथील आठवडी बाजारात मजुरीच्या कामासाठी जात असलेल्या एका मजुराच्या दुचाकीची रोही ला धडक बसली. यामध्ये मजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवार १३ जुलै रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास बोरी - वालूर रोडवरील नागठाणा पाटी जवळ घडला. 

या (Parbhani Laborer Death) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बबन सखाराम भुमरे वय ५५ वर्ष, रा. कान्हड ता. सेलू असे मयताचे नाव आहे. संबंधित व्यक्ती हा मजुरीच्या कामासाठी आठवडी बाजाराकडे येत होता. नागठाणा पाटीजवळ अचानक रोही समोर आल्याने दुचाकीची धडक होऊन अपघात झाला. यामध्ये बबन भुमरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक रोही आल्याने भुमरे यांचे दुचाकीवरील नियत्रण सुटले. ते रोडवरजोरात कोसळले.

परिसरातील नागरीकांनी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. बबन भुमरे हे मोजमजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे.  मयताच्या कुटूंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.घटनास्थळाला बोरी पोलिसांनी भेट दिली असून नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related to this topic: