Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी दुचाकी अपघात

परभणीत आयशरची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

Parbhani Bike Accident: नांदेड महामार्गावरील अपघातात आयशरचा दुचाकी धडकून शेख सत्तार यांचा गंभीर जखमीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटना नोंद करण्यात आली.


परभणीत आयशरची दुचाकीला धडक एकाचा जागीच मृत्यू

Parbhani Bike Accident |

 

पूर्णा - नांदेड महामार्गावर गौर शिवारात अपघात; मयत परभणी येथील रहिवाशी

परभणी/ पूर्णा (Parbhani Bike Accident) : पूर्णा - नांदेड महामार्गावर बुधवार ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आयशर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. मयत इसम परभणीतील आनंद नगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे.

या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, शेख सत्तार शेख जुल्फेकर वय ५१ वर्ष रा.आनंद नगर परभणी ह.मु.क्रांती नगर पूर्णा असे मयताचे नाव आहे. शेख सत्तार हे बुधवारी दुपारी आपल्या एम.एच.२२ ए.जे. ०५१६ या दुचाकीने पूर्णा येथून चुडाव्याच्या दिशेने जात होते. गौर शिवारात नोव्हेल्टी बियर बार समोर भरधाव वेगावातील एम.एच.२६ सी.एच. ९१९७ या क्रमांकाच्या आयशरने  दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने शेख सत्तार यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्या नंतर सपोनी सुशांत किनगे, पोलीस अंमलदार महादेव आगळे, विलास मिटके, गौतम ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात ग्रस्त वाहने ताब्यात घेतली. पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठवीला. चुडावा पोलीसात नोंद करण्यात आली आहे. 

अपघातांचा ब्लॅक स्पॉट
पूर्णा - नांदेड महामार्गावर नेहमीच अपघात होत आहेत. हा महामार्ग अपघाताचे ब्लॅक स्पॉट ठरत आहेत. या रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे.

Related to this topic: