Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी कार अपघात

परभणीत खड्डयात आदळून चाक निखळल्याने कार पलटी; चौघे जखमी

Parbhani car accident: गंगाखेड शहरात खड्डयात आदळून एक्सलसहित चाक निखळल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना बुधवार १० जून रोजी दुपारी झालेल्या अपघातात चौघे जखमी


परभणीत खड्डयात आदळून चाक निखळल्याने कार पलटी चौघे जखमी

Parbhani car accident |

 

गंगाखेड शहरातील परळी नाक्यावरील घटना

परभणी (Parbhani car accident) : गंगाखेड शहरात खड्डयात आदळून एक्सलसहित चाक निखळल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जखमी झाल्याची घटना बुधवार १० जून रोजी दुपारी झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले असुन यातील एकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास परभणी येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की परभणीकडून गंगाखेड शहराच्या दिशेने येणारी कार क्रमांक एमएच ०२ बीझेड ७१२५ ही परळी नाका चौकात आल्यानंतर या चौकात परभणीच्या दिशेने असलेल्या खोलगट खड्डयात कार आदळून समोरील उजव्या बाजूचे चाक एक्सलसह निखळून पडल्यामुळे महाराणा प्रताप चौकाच्या कठड्यावर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात शेख अशफाख शेख अफजल वय ४५ वर्ष, शेख मुश्ताक शेख अफजल वय ५५ वर्ष, शेख सलीमोद्दीन शेख बुऱ्हानोद्दीन वय ५० वर्ष व सय्यद नाजेम सय्यद अमीर अली वय ५३ वर्ष सर्व रा. परभणी हे चौघे जखमी झाले आहेत.

अपघाताची घटना घडताच या चौकात असलेल्या शेख मोसीन, किरण धापसे, सैफ चाऊस, बाबा खान, शेख असेफ आदींनी जखमींना तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश वडजे, डॉ. मदिहा फईमोद्दीन काजी, परिचारिका मंजुषा राख, अश्विनी मुंडे, भारत भदर्गे, रशीद शहा आदींनी प्रथमोपचार केले. यातील शेख अशफाक यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Related to this topic: