Parbhani Person Death: परभणीत तालुक्यातील ताडकळस येथे रात्री नऊच्या सुमारे वाजत भरधावातील कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाली. त्याचा मृत्यु होण्याचा खुलासा झाला
ताडकळस- सिंगणापूर रस्त्यावर अपघात वाहन चालकावर गुन्हा दाखल....!
परभणी (Parbhani Person Death) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार ११ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंगणापूर रस्त्यावर घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, ताडकळस येथील बांधकाम गुत्तेदार असलेले राम सिताराम बनसोडे वय ३९ वर्ष हे नेहमीप्रमाणे ताडकळस सिंगणापूरर स्त्यावरील गॅस एजन्सीजवळ चालण्याचा व्यायाम करुन पायी घरी जात होते. यावेळी मागुन आलेल्या भरधाव वेगातील एम.एच. २२ बी.झेड. ७५९१ या कारने त्यांना जोराची धडक दिली. अपघातात राम बनसोडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ताडकळस येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले.
पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. सदर प्रकरणी दशरथ बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन ताडकळस पोलिसात कार चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवार १२ जुलै रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई - वडिल, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. सपोनि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. तावडे तपास करत आहेत.