Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी काँग्रेस सत्याग्रह

परभणीत काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

Parbhani Congress Satyagraha: परभणीत काँग्रेसने अयोध्या ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहारावरील मागणी दाखल केली, रघुपतीचा घोटाळ्याचा विरोध करून त्यावर गुंतवणूक करण्यात आली.


परभणीत काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

Parbhani Congress Satyagraha |

 

श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये झालेल्या घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याची मागणी

परभणी (Parbhani Congress Satyagraha) : अयोध्येतील राम मंदिर निर्माण आणि व्यवस्थापनाशी संबंधित ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि घोटाळे झाले आहेत. या कारस्थानात सहभागींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार १३ जुलै रोजी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आला. पेडा हनुमान मंदिरासमोर आंदोलन झाले.

प्रभु श्रीरामांना भक्तांनी दिलेली देणगी ही संघ, भाजपा पदाधिकार्‍यांनी चोरली असून मौल्यवान वस्तू गायब आहेत. भक्तांनी दान केलेल्या देणग्यांचा दुरुपयोग करुन भाविकांच्या भावनांशी खेळ केला आहे. मंदिर परिसरातील जमीनी बाजार भावापेक्षा जास्त किंमतीत खरेदी केल्या आहेत. घोटाळ्या बाबत तक्रारी करुनही मुख्य सुत्रधार वाचविले जात आहेत. लूट करणार्‍यांना सद्बुध्दी दे म्हणत टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्यात जावून श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्याकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहारा बाबत महंत नृत्य गोपालदास, चंपतराय, अनिल मिश्रा, गोविंददेव गिरी, गोपाळ राव यांच्यासह कटात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या (Parbhani Congress Satyagraha) सत्याग्रह आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी, शहराध्यक्ष रविराज देशमुख, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, नागसेन भेरजे, रामभाऊ घाटगे, अलमगीर खान, बंडू पाचलिंग, अमोल जाधव, अजित वरपूडकर, गणेश घाटगे, शेख सलमान, शेख नासेर, नारायण आढाव, अमोल देशमुख, एकनाथ घांडगे, शामराव धर्मे, हनुमंत डाके, रावसाहेब मोकाशे, केशव बुधवंत, पवन आडळकर, वैजनाथ महिपाल, राम देशमुख, शेख इस्माईल, विनोद तरटे, सचिन जवंजाळ, अभय देशमुख, माधव फाजगे, प्रल्हाद पारवे, रमेश पवार, अ‍ॅड.रमेश जाधव, दादाराव गव्हाणे, अतिम अन्सारी, आसेफ अन्सारी, निखिल धामणगावे, सय्यद फिरोज, रंगनाथ वीरकर, संजय सत्वधर, आनंद धनले, मिलिंद आठवे, गालेब भाई, नमा खान, मलिक सर, रज्जाक कुरेशी, साबेर कुरेशी, अनिल वजीर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नाझिया इलाही खानचा निषेध

दिल्लीच्या भाजपा नेत्या नाझिया इलाही खान यांनी जाहीर सभा, समाज माध्यमातून मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे देशभरातील मुस्लीम समाजात तीव्र संताप पसरला आहे. नाझिया इलाही खान यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नवा मोंढा पोलिसांना देण्यात आले.