Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी ऑटो चालक मृत्यू

परभणीत आजाराला कंटाळून उंदीर मारण्याचे रसायन पिल्याने उपचारादरम्यान मृत्यू

Parbhani Auto Driver Death: सोरायसीसच्या आजाराला कंटाळून अ‍ॅटो चालकाने उंदीर मारण्याचे विषारी रसायन घेतले. ऑटो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.


परभणीत आजाराला कंटाळून उंदीर मारण्याचे रसायन पिल्याने उपचारादरम्यान मृत्यू

Parbhani Auto Driver Death |

 

नवा मोंढा पोलिसात ऑटो चालकाच्या मृत्यूची नोंद

परभणी (Parbhani Auto Driver Death) : सोरायसीसच्या आजाराला कंटाळून अ‍ॅटो चालकाने उंदीर मारण्याचे विषारी रसायन घेतले. ऑटो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात २७ जुलै रोजी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

बंडू मगर यांनी खबर दिली आहे. दत्ता नामदेव मगर वय ४६ वर्ष, रा. राजेंद्रगिरी नगर असे मयताचे नाव आहे. खबर देणारे यांचे भाऊ दत्ता यांनी सोरायसीस आजाराच्या त्रासाला कंटाळून उंदीर मारण्याचे विषारी रसायन अंडाभुर्जीमध्ये टाकून खाल्ले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान २७ जुलै रोजी दुपारी अडिचच्या सुमारास सदर (Parbhani Auto Driver Death) इसमाचा मृत्यू झाला. प्रकरणाचा तपास पोह. सचिन बोरसुडकर करत आहेत.

चक्कर आल्याने तरुणाचा मृत्यू
परभणी :
चक्कर आल्याने एका ३४ वर्षीय तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. विशाल डोईफोडे यांनी खबर दिली आहे. विक्रम डोईफोडे वय ३४ वर्ष, रा. क्रांती नगर परभणी, असे मयताचे नाव आहे. कोतवालील पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोह. माने करत आहेत.