Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी विधानसभा निवडणूक

परभणीत शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांचे अर्ज दाखल

Parbhani Assembly Election: परभणी विधानसभा निवडणुकासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, ज्यामध्ये महाविकास आघाडीने डॉ. विवेक नावंदर


परभणीत शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांचे अर्ज दाखल

Parbhani Assembly Election |

 

महाविकास आघाडीकडून डॉ. विवेक नावंदर, महायुतीकडून सईद खान यांना उमेदवारी

परभणी (Parbhani Assembly Election) : परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार १ जून महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांसह सात जणांनी अर्ज दाखल केले आहे. 

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी (Parbhani Assembly Election) २१ जून रोजी मतदान होणार आहे. त्या करीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवार  १ जून रोजी अंतिम मुदत होती. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहिर केले आहे. महाविकास आघाडीकडून उबाठाचे डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. त्यांनी उबाठा, काँग्रेसच्या जेष्ठ मंडळीसोबत अर्ज दाखल केला.  यावेळी खा. संजय जाधव,  आ.डॉ. राहूल पाटील, महापौर सय्यद इकबाल, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांची उपस्थिती होती. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ. संजय बांगर, नगराध्यक्ष आसेफ खान आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा सदस्य विजयसिंह जामकर यांनी देखील उमेदवारी दाखल केली. यावेळी मनपा सदस्य आकाश लहाने, अक्षय देशमुख, अर्जुन सामाले उपस्थित होते. काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशिल देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली.

यावेळी माजी खा. तुकाराम रेंगे, भगवान वाघमारे, मनपा सदस्य सुनिल देशमुख, गुलमिर खान, नदीम इनामदार आदींची उपसिथती होती. या शिवााय विश्वजीत बुधवंत, संग्राम जामकर आणि मेहराज खान शेरगुल खान पठाण यांनीही अर्ज दाखल केले आहे. विद्यमान आ. विप्लव बाजोरीया यांची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.अर्जांची छाननी मंगळवार २ जून रोजी होणार आहे. ४ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम  दिनांक आहे. त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Related to this topic: