Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत ऑटो व कारचा भीषण अपघात; ५ जण जखमी, तिघांना परभणीत हलविले

गंगाखेड येथे भरधाव वेगातील कारने ऑटोला समोरासमोर धडक दिल्याने ऑटोतील पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार (दि. २२ मे) रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास पालम रस्त्यावर घडली.


परभणीत ऑटो व कारचा भीषण अपघात ५ जण जखमी तिघांना परभणीत हलविले

Parbhani Accident |

गंगाखेडच्या पालम रस्त्यावरील घटना

परभणी (Parbhani Accident) : गंगाखेड येथे भरधाव वेगातील कारने ऑटोला समोरासमोर धडक दिल्याने ऑटोतील पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार (दि. २२ मे) रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास पालम रस्त्यावर घडली. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथून गंगाखेडमार्गे अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बु. गावाकडे जाणारा एमएच ५५ ए ०६७२ क्रमांकाचा ऑटो शुक्रवार रात्री पालम रस्त्यावरील महेश जिनिंग परिसरात पोहोचला असता समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एमएच २० एचबी ७८४४ क्रमांकाच्या कारने ऑटोला जोरदार धडक दिली.

या अपघातात ऑटो चालक रामेश्वर नामदेव वाघमारे (वय ३८), परमेश्वर नामदेव वाघमारे (वय ३६), कृष्णा सुधाकर वाघमारे (वय ३४), तातेराव मुसने (वय ३७) आणि गोविंद माधव घोडके (वय ४०, सर्व रा. नांदुरा बु., ता. अहमदपूर) हे जखमी झाले.

अपघातानंतर रावण भालेराव आणि परमेश्वर भालेराव यांच्या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. नागनाथ निलंगेकर, परिचारिका प्रज्ञा जोगदंड आणि गोविंद वडजे यांनी प्रथमोपचार केले.

जखमींपैकी कृष्णा सुधाकर वाघमारे, तातेराव मुसने आणि गोविंद माधव घोडके यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी रामेश्वर नामदेव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार (दि. २३ मे) रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: