Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नीट परीक्षेतील पेपरफुटी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार: लातूरमध्ये काँग्रेसची जोरदार निदर्शने

नीट परीक्षेतील पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार निदर्शने करण्


नीट परीक्षेतील पेपरफुटी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार लातूरमध्ये काँग्रेसची जोरदार निदर्शने

Paper Leak Protest |

लातूर (Paper Leak Protest) : नीट परीक्षेतील पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार निदर्शने करण्यात आली. ट्युशन एरियातील उद्योग भवन येथे झालेल्या आंदोलनात केंद्र सरकारचा तीव्र धिक्कार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला गेला असून विद्यार्थी व पालकांचे आर्थिक नुकसान तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया भ्रष्ट झाली आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकारच्या कामकाजाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केंद्र सरकार शिक्षण क्षेत्राबाबत गंभीर नसल्याची टीका केली. सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले असून त्यांना परीक्षा पारदर्शकपणे घेता येत नाहीत, असे ते म्हणाले. एवढ्या महत्त्वाच्या परीक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत आपण लोकसभेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत परीक्षा व्यवस्थापनात गंभीर अपयश झाल्याचा आरोप केला. दरवर्षी पेपरफुटीचे प्रकार समोर येत असूनही उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. नीट परीक्षा रद्द झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी व पालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सरकारचा धिक्कार काँग्रेस पक्ष करत असून विद्यार्थी व पालकांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात युवक काँग्रेस अध्यक्ष विष्णू धायगुडे, जिल्हाध्यक्ष रोहित बिराजदार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर साळुंखे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, निलेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष महेश सोळंके, शहराध्यक्ष व्यंकटेश झिपरे, उबेद शेख, श्रवण काकडे, अबूजर शेख, कमलेश वारद, आमीर शेख, महेश म्हेत्रे, प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, प्रा. शिवाजी जवळगेकर, कैलास कांबळे, अभिषेक पतंगे, अकर माडजे, फैसल कायमखानी, महेश नागलगावे, तांबोळी, पीराजी साठे, विश्वजीत पाटील, चैतन्य पवार, यश बन, अतुल साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या. त्यात प्रमुख मागण्यांमध्ये गैरव्यवहाराची सर्वोच्च स्तरावर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, पेपरफुटी व भ्रष्टाचारातील सर्व आरोपींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा, एनटीएच्या संपूर्ण कार्यपद्धतीची सखोल चौकशी व सुधारणा कराव्यात, नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारचे अपयश!

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केंद्र सरकारवर टीका करत या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत गंभीर नसून परीक्षा व्यवस्थित घेण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारचे अपयश स्पष्ट झाले असून विद्यार्थी व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालक व विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा भंग करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related to this topic: