Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भाटेगाव रानडुकर हल्ला

भाटेगावात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; धाडस दाखवत डुकरास पकडले..

Wild Boar Attack: कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शेतशिवारात शेतामध्ये काम करत असताना सोमाजी किसन वानोळे हा शेतकरी रानडुकरच्या हल्ल्यात जखमी झाला.


भाटेगावात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी धाडस दाखवत डुकरास पकडले

Wild Boar Attack |

डोंगरकडा (Wild Boar Attack) : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शेतशिवारात शेतामध्ये काम करत असताना सोमाजी किसन वानोळे हा शेतकरी रानडुकरच्या हल्ल्यात जखमी झाला. शेतकर्‍यांनी जीवाची परवा न करता देखील त्याने त्या रानडुक्करास झटापट करून पकडले. आणि आरडा ओरड केला तेंव्हा आजू -बाजूला असलेले काही शेतकरी धावत आले आणि त्या सर्वांनी मिळून त्या डुकरास पकडले असल्याची घटना घडली.
   
भाटेगाव येथील शेत शिवारात शेतकरी  सोमाजी वानोळे हा २७ जून रोजी  सायंकाळी ७:३० च्या सुमारास घराकडे येत होता. तेंव्हा त्याच्यावर रानडुक्कराणे हल्ला केला, त्यात तो जबर जखमी सुद्धा झाला. डुकराच्या हल्ल्यात जखमी होऊन सुद्धा हिंमत न हारता त्याने त्याची मान पकडली आणि त्याच्यावर स्वार झाला त्यातच त्याने आरडा ओरड केला असता आजू -बाजूला असलेले शेतकरी धावत आले.आणि त्या सर्वांनी मिळून त्या डुकरास दोर खंडाच्या साह्याने बांधून ठेवले. (Wild Boar Attack) जखमी सोमाजी वानोळे ह्यास नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.