Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ओबीसी आरक्षण न मिळाल्याने पोतरा ग्रामसभेत गोंधळ

कळमनुरी तालुक्यातील पोतरा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला.


ओबीसी आरक्षण न मिळाल्याने पोतरा ग्रामसभेत गोंधळ

OBC Reservation |

कळमनुरी  (OBC Reservation) : कळमनुरी तालुक्यातील पोतरा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीसाठी आयोजित विशेष ग्रामसभेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. यामुळे ग्रामसभा गोंधळात पार पडली असून ग्रामस्थांनी इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या करण्यासही नकार दिला.

आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ जून रोजी पोतरा ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य आरक्षणासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी व्ही. एन. किन्होळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला ग्राम महसूल अधिकारी दिनेश राऊत आणि ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. अंभोरे उपस्थित होते.

सभेदरम्यान अध्यासी अधिकाऱ्यांनी २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार नऊ सदस्यांपैकी अनुसूचित जातीसाठी तीन आणि अनुसूचित जमातीसाठी दोन जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामुळे आरक्षणाचा ५० टक्के कोटा पूर्ण झाल्याने ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण उपलब्ध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या निर्णयाला उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडत ग्रामस्थांनी सभेतच विरोध दर्शविला. आरक्षण प्रक्रियेबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत अनेक ग्रामस्थांनी सभा पुढे चालू देण्यास विरोध केला.

यावेळी काही ग्रामस्थांनी, "जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका होऊ देणार नाही," अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. परिणामी वातावरण तणावपूर्ण बनले आणि ग्रामसभा प्रभावीपणे पार पडू शकली नाही.

दरम्यान, ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेच्या इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या करण्यासही नकार दिला. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेबाबत गावात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रसंगी पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, शंकर मुलगीर, गणेश मुलगीर, सरपंच रघुनाथ गुहाडे, माजी सरपंच गुणाजी फोपसे, रामराव मुलगीर, शंकर रणवीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: