Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

नेर युवक मृत्यू

भरधाव ट्रकच्या धडकेत २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

Ner Youth Death: नेर शहरातील एक चिकन व्यवसायकांचे २१ वर्षीय पुत्र शेख शोएबला दारव्हा रस्त्यावर भरधाव ट्रकने धडका दिला. जखमामुळे त्याने प्राण गमवले, कुटुंबात मोठा आघात झाला.


भरधाव ट्रकच्या धडकेत २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

Ner Youth Death |

 

शेळ्या खरेदीसाठी जात असताना काळाचा घाला
दारव्हा रोडवरील कब्रस्तानाजवळ भीषण अपघात

नेर (Ner Youth Death) : नेर शहरातील माळीपुरा येथील २१ वर्षीय युवकाचा भरधाव ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास दारव्हा रोडवरील कब्रस्तानाजवळ घडली. या घटनेमुळे नेर शहरात शोककळा पसरली असून, चिकन व्यवसाय करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शोएब शेख इलियास (वय २१, रा. माळीपुरा, नेर) हा दुचाकी (क्र. एमएच-२९ एएफ-११०१) वरून ग्रामीण भागात मटन विक्रीसाठी शेळ्या खरेदी करण्यासाठी जात होता.

दारव्हा रोडवरील कब्रस्तानाजवळ पोहोचताच ट्रक (क्र. एमएच-३४ बीझेड-०८९३) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शोएब गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

मृतक शोएब हा वडील शेख इलियास  शेख अयुब यांच्यासमवेत चिकन व्यवसाय करीत होता. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, त्याच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी तक्रारदार  शेख रियाज शेख अयुब यांच्या तक्रारीवरून संबंधित ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१ व १०६ अन्वये नेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.