Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नीट विद्यार्थी आत्महत्या

नीट परीक्षेच्या तनावामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

NEET student suicide: १८ वर्षीय विद्यार्थ्याने नीट परीक्षेच्या तनावातून विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.


नीट परीक्षेच्या तनावामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

NEET student suicide |


हिंगोली आत्महत्येपूर्वी व्हिडीओ करून विहिरीत उडी मारून संपविले जीवन

हिंगोली (NEET student suicide) : शहरातील अष्टविनायक नगरातील एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने नीट परीक्षेच्या तनावातून विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने मम्मी मला माफ कर, माझा तान घेऊ नको, मी पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्माला येणार आहे. भावासोबत चांगली रहा, असा व्हिडीओ केला होता. 

या बाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील अष्टविनायक नगरातील सुशिल विलास ढगे (१८) या विद्यार्थ्याने १० वी परीक्षेत ९२ तर १२ वी परीक्षेत ६२ टक्के गुण मिळविले होते. त्याने नीट परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. घरच्या लोकांनीही त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. याच महिन्यात सुशिलने नीटची परीक्षा दिली होती. परंतु त्याचा पेपर कठीण गेल्यामुळे तो काही दिवसापासून बेचैन होता. तरी देखील त्याला नीट परीक्षेत चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती. २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने घरात कोणालाही न सांगता बाहेर गेला. बराचवेळ होऊन सुध्दा तो घरी आला नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती.

सुशिलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मम्मी मला माफ कर, माझा तान घेऊ नको, मी पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्माला येणार आहे. भावासोबत चांगली रहा, मला काही समजत नाही, मी आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओ केला होता. हा व्हिडीओ पाहील्यानंतर कुटूंबातील सारेचजन घाबरले होते. २४ जून बुधवार रोजी शोध मोहीम सुरू केली असता अष्टविनायक नगरातील एका विहिरीमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच कुटूंबीयांनी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत सुशिल याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.