Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा

नीट पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला मोठा दणका! पी.व्ही. कुलकर्णीच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर

पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसची मुदत संपल्यानंतर संबंधित बांधकामाचे पाडकाम सुरू करण्यात आले.


नीट पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला मोठा दणका पीव्ही कुलकर्णीच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर

NEET Paper Leak Case |

बीड (NEET Paper Leak Case) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट  पेपरफुटी प्रकरणातील कथित मास्टरमाईंड प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्याविरोधात कारवाईचा वेग वाढला असून, बीड शहरातील शाहूनगर परिसरात सुरू असलेल्या त्यांच्या चार मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसची मुदत संपल्यानंतर संबंधित बांधकामाचे पाडकाम सुरू करण्यात आले. NEET पेपरफुटी घोटाळ्याच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी धडक कारवाया केल्या आहेत. यामध्ये लातूरमधील आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर आणि प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांनाही 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, बीडमधील शाहूनगर भागात कुलकर्णी यांच्या नावावर सुरू असलेल्या चार मजली इमारतीच्या बांधकामात अनियमितता आणि नियमभंग आढळल्याने नगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. नोटीसनंतरही आवश्यक कार्यवाही न झाल्याने अखेर संबंधित ठेकेदाराकडूनच हे बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट  परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे. या घोटाळ्यात कुलकर्णी यांचे नाव समोर आल्यानंतर सिबीआय ने त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्तांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’चा तपास

CBI तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या फ्लॅटवर प्रा. कुलकर्णी विशेष क्लासेस घेत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मोटेगावकर क्लासेसमध्ये चालणाऱ्या ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’साठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. CBI सध्या कुलकर्णी, मोटेगावकर आणि डॉ. शिरुरे यांच्यातील कथित संबंध आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.

लातूर ते पुणे कनेक्शन

तपासादरम्यान कुलकर्णी यांचे पुण्यातील काही व्यक्तींशी संपर्क असल्याचेही समोर आले आहे. त्याच धाग्यावरून  सिबीआय चे पथक लातूरपर्यंत पोहोचले आणि चौकशीअंती कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले. ते चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून लातूरच्या कैलासनगर भागात राहत होते. त्यांचे कुटुंब सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. मूळ बीडचे रहिवासी असलेल्या कुलकर्णी यांनी शहरात उभारलेल्या चार मजली इमारतीवर आता प्रशासनाचा हातोडा पडल्याने नीट पेपरफुटी प्रकरणातील कारवाई आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे.

Related to this topic: