Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नीट' पेपर फुटी प्रकरण

'नीट' पेपर फुटी प्रकरणी सीबीआय लातुरात!

neet paper leak:


नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय लातुरात

neet paper leak |

 

आरसीसीचे प्रा. मोटेगावकर यांची कसून ‌चौकशी

लातूर (neet paper leak) : नीट 2026 परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने विलक्षण गांभीर्याने तपासणी सुरू केली असून, शुक्रवारी पहाटेपासूनच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लातूर येथील नामवंत आरसीसी क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या लातूर येथील एसएससी बोर्ड परिसरातील ओमकार रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅटवर तळ ठोकून कसून चौकशी सुरू केली आहे. मध्येच अपार्टमेंट बाहेर आलेल्या एका अधिकाऱ्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी 'सॉरी' एवढेच म्हणून अधिक बोलण्यास नकार दिला.  दरम्यान, सीबीआयची दोन पथके बुधवारी पहाटेच लातूर शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. सीबीआय अधिकाऱ्यांच्या या टीम मध्ये एकूण 28 सदस्य असल्याची‌ माहिती मिळाली आहे.

प्राथमिक चौकशीनंतर त्यांनी लातूर येथील एका नामवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही . कुलकर्णी‌ यांना‌ चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रा. कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून चार वर्षांपूर्वीच येथील एका नामांकित महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, त्यांनी 'नीट'चा रसायनशास्त्राचा पेपर सेट (neet paper leak) केला होता. सीबीआयने गुरुवारी सकाळी त्यांच्या पद्मावती नगर भागातील निवासस्थानी अचानक जाऊन काही कागदपत्रांसह त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रा. कुलकर्णी यांचे पुण्यातही एक घर असल्याचे समजते. 

दरम्यान सीबीआयचे पथक शुक्रवारीही लातूरला तळ ठोकून असून पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात गोपनीयतेच्या नावाखाली भाष्य करण्यास नकार दिला. मात्र सीबीआयच्या रडारवर आणखीही काही बडे अधिकारी आणि खाजगी क्लासेसचे संचालक असल्याचे समजते.

Related to this topic: