Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण दडपता कामा नये!


नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण दडपता कामा नये

NEET Exam Scam |

अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा इशारा

लातूर (NEET Exam Scam) : देशभरातील तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थी नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे प्रभावित झाले आहेत. देशभरात धाडसत्र सुरू आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पुणे सगळीकडे नीटच्या गद्दारांचे धागेदोरे मिळत आहेत. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेपरफुटी प्रकरण दडपता कामा नये, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

लातूर पॅटर्नला हादरवणारी बाब म्हणजे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय इतर क्लासेसवाल्यांची कसून चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे. परिस्थिती गांभीर्याने हाताळली नाही तर राज्यभर हिंसक पडसाद उमटू शकतात, असा इशाराही नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

नीट 2026 परीक्षेत एखाद्या क्लासेसवाल्याचे ४२ प्रश्न जसेच्या तसे उमटतात. याबाबत आठ तास सीबीआय चौकशी झाली आहे. गेस पेपरचा गुंता कसा झाला, याबाबत सीबीआय चौकशीनंतरही खुलासा होऊ शकत नाही. दुसरीकडे हे प्रकरण गुंडाळल्याचे संकेत काही लोकांना हाताशी धरून सोशल मीडियातून फिरविले जात आहेत. यामुळे सीबीआय चौकशीकडेही शंकेने पाहिले जात आहे, असा आरोप जावळे पाटील यांनी केला आहे.

नीट पेपरफुटीमुळे पिढीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केवळ पंधराशे रुपये परीक्षा फी माफ करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल जावळे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भविष्यात असे शैक्षणिक गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारने कडक पावले उचलणे आवश्यक आहे. नॉमिनल प्रवेश, अमर्याद प्रवेश या सर्व प्रकारांवर निर्बंध आणले पाहिजेत. पी. टी. ए. अर्थात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशननेही यावर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. सर्व क्लासेस संचालकांची कमाई किती याची सविस्तर माहिती जनतेसमोर आणली पाहिजे. कोचिंगच्या शाखा, शिकवणी आणि शिक्षकांची माहितीही सार्वजनिक झाली पाहिजे.

सरकारने लवकरच कडक पावले उचलावीत, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांना कोटीची नुकसान भरपाई द्या!

एनटीए समिती बरखास्त करावी. नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी. दोषी प्राध्यापकांच्या पदव्या रद्द करून त्यांच्या क्लासेसवर कायमस्वरूपी निर्बंध घालावेत. नॉमिनल अॅडमिशन व अमर्याद प्रवेश यावर निर्बंध घालावेत. सर्व क्लास चालक, शिक्षक व प्राध्यापक यांच्या कमाई व मिळकतीची सखोल चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या छावा संघटनेने केल्या आहेत.

Related to this topic: