NCC CATC Camp: गांधीजांच्या MGM कॉलेजातील विद्यार्थी माणिक स्मारक आर्य विद्यालयामध्ये १० दिवसीय CATC शिबिरासाठी रवाना झाले. या शिबिरात ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग
हिंगोली (NCC CATC Camp) : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गांधींले येथील MGM कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एनसीसीच्या CATC म्हणजेच Combined Annual Training Camp मध्ये सहभागी होण्यासाठी माणिक स्मारक आर्य विद्यालयातील 49 कॅडेट्स सेकंड ऑफिसर शिवराज सरनाईक यांच्या नेतृत्वात रवाना झाले आहेत.
या दहा दिवसीय शिबिरामध्ये (NCC CATC Camp) कॅडेट्सना सैनिकी शिस्त, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास व राष्ट्रसेवेची भावना रुजवण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान ड्रिल प्रशिक्षण, शस्त्र हाताळणी व फायरिंग, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट व बॅटल क्राफ्ट, शारीरिक प्रशिक्षण, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम, समूह चर्चा, नेतृत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन व सामाजिक सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत. यासोबतच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या (NCC CATC Camp) प्रशिक्षणामुळे कॅडेट्समध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना व नेतृत्व क्षमता विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात संरक्षण दलांमध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक प्राथमिक ज्ञान व प्रत्यक्ष अनुभवही या शिबिरातून मिळतो. दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सहभागी कॅडेट्सना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.