Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

नायरा पेट्रोल पंप

शुद्ध पेट्रोलच्या शोधात वाहनचालक;  नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी!

Nayara Petrol Pump: E20 समस्यामुळे अनेक वाहने बंद पडत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन वाहनात पेट्रोल भरण्यासाठी चालक नायरा पंप गाठून पेट्रोल भरणा करत आहे.


शुद्ध पेट्रोलच्या शोधात वाहनचालक  नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी

Nayara Petrol Pump |

मानोरा (Nayara Petrol Pump) : मानोरा शहरापासून २ किलो मीटर अंतरावर असलेल्या नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची एकच गर्दी होत असुन पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची झुंबड दिसून येत आहे. सविस्तर असे की, शहरातील इतर पंपावर इथेनॉल मिश्रित ( ई २० ) पेट्रोल मोटर सायकल आणि चार चाकी वाहन टाकले तर रस्त्यावर धावताना वाहन हेलकावे मारत असल्याचा प्रत्यय वाहन चालकांना येत आहे. या समस्यामुळे अनेक वाहने बंद पडत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन वाहनात पेट्रोल भरण्यासाठी चालक (Nayara Petrol Pump) नायरा पंप गाठून पेट्रोल भरणा करत आहे. 
 
मानोरा-दिग्रस रोडवर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर एकच (Nayara Petrol Pump) नायरा कंपनीचा पेट्रोल पंप असुन इथेनॉल मिश्रित ( ई २० ) पेट्रोलच्या वाहनाला येणाऱ्या समस्यामुळे नायरा पंपाला पसंती देत वाहनधारक नायरा पंपावर वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे.

वाहनधारकाची पेट्रोल टाकण्यासाठी एकच गर्दी पंपावर वाढत असल्याने नायरा कंपनीकडे पेट्रोल पुरवठा करण्याकरता टँकर वाढविण्याची मागणी केली आहे.
-माधव सरोदे, संचालक नायरा पेट्रोल पंप, बेलोरा