चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे श्री श्री बासंती पूजा दुर्गा समितीच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते.
पारंपारिक धार्मिक आयोजनामुळे रेगडीला आले जत्रेचे स्वरूप...
चामोर्शी (Navratri Celebration) : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे श्री श्री बासंती पूजा दुर्गा समितीच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. मागील चार वर्षापासून सुरू झालेले धार्मिक व सांस्कृतिक आयोजन व आनंद मेला मिना बाजार यामुळे संपूर्ण चामोर्शी तालुक्याचे जिल्ह्यातील अनेक नागरिक या दुर्गा उत्सवाला भेट देत असतात. विशेष म्हणजे बंगाली बांधवांच्या समाजात दुर्गा उत्सवाच्या वेळेस अनेक नातेवाईक व बाहेरगावी असलेले नोकरी पेशा कर्मचारी या उत्सवाची वर्षभर वाट बघत असतात आणि या निमित्ताने ते गावाकडे येऊन दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण कुटूंबासह पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग घेऊन उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करित असतात त्यामुळे या उत्सवाला मोठा महत्व येत असते. विविध धार्मिक पद्धतीने दुर्गा मातेची चार ते पाच दिवस पूजा अर्चा व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून या उत्सवाला रंग दिली जाते. यामध्ये स्थानिक युवक महिला व गावकरी यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग करून कार्यक्रमाची नियोजन करून कार्यक्रमात भव्यदिव्य आयोजन करण्यात येते. मागील 4 वर्षापासुन अती मागास ग्रामीण भाग असलेल्या रेगडी येथे मागील चार वर्षापासून त्या कार्यक्रमाचे आयोजनाची सुरुवात करण्यात आली. मात्र अल्पशा काळातच या नियोजनबद्ध आयोजनामुळे चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्हायातील दुर्गा उत्सवाकरिता नागरिक तिथे मोठ्या संख्येने भेट देत असतात. या आयोजनासाठी रोज हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे भक्तांना वितरण करण्यात येते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री श्री बांसती दुर्गा पुजा समिती रेगडीचे अध्यक्ष सुरेश शाहा,उपाध्यक्ष कमल मिर्धा, मुरलीधर रॉय,सचिव अमित चक्रवर्ती,सहसचिव पिंटू मिर्धा,रोहीत मंडल,कोषाध्यक्ष उमेश मल्लीक,सहकोषाध्यक्ष प्रभात हलदार,शुभम कुडू स्टेज मॅनेजर प्रशांत शाहा, उमेश शाहा,विक्की शाहा,सागर रॉय,निखिल समद्दार,श्रीमती चिनु हलदार,शिप्रा शाहा, शालिनी कुंडू आदी सहकार्य करीत आहे.
रेगडी येथे रील मास्टर विलास झठ्ठे यांच्या कार्यक्रमाचे देवराव होळी यांचें हस्ते उद्घाटन ...
श्री श्री बासंती दुर्गा पुजा समिती रेगडीचे वतीने आयोजित स्टॅंडिंग कॉमेडी शो इन्स्टाफ्रेम रील मास्टर साधा माणूस विलास झठ्ठे यांच्या आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख,उद्योगपती शैलेद्र शाहा,सेवानिवृत्त अभियंतांदिलीप गौरकर, मुख्याध्यापक श्याम पदमाकर,भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,सामाजिक कार्यकर्त्या रूम्पा शाहा, पत्रकार हेमंत उपाध्ये,आदी मान्यवर उपस्थित होते.