Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

नाशिक टीसीएस प्रकरणात महिला आयोगाचा 50 पानी अहवाल समोर; निदा खानचा महत्त्वाचा सहभाग उघड

नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानी सविस्तर अहवाल समोर आला आहे.


नाशिक टीसीएस प्रकरणात महिला आयोगाचा 50 पानी अहवाल समोर निदा खानचा महत्त्वाचा सहभाग उघड

Nashik TCS Case |

नाशिक (Nashik TCS Case) : टीसीएस प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल प्रसिद्ध
नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानी सविस्तर अहवाल समोर आला आहे. या अहवालात निदा खानचा या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महिलांचा छळ आणि धार्मिक शिकवणीचे आरोप
अहवालानुसार, निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केल्याचे नमूद करण्यात आले आहे. जाळ्यात अडकलेल्या मुलींना धार्मिक शिकवण देण्यात येत असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रारदार महिलांच्या जबाबांनुसार, दानिश, तौफिक आणि रजा मेनन हे आरोपी मुलींना धार्मिक जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होते, तर टीसीएस नाशिक युनिटवर त्यांचा दबाव आणि नियंत्रण असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

निदा खानचा ‘defined role’ अहवालात अधोरेखित
या प्रकरणात निदा खानची भूमिका स्पष्टपणे “defined role” म्हणून नमूद करण्यात आली असून, ती मुलींना धार्मिक प्रथा आणि शिकवण देत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

POSH समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
टीसीएस अंतर्गत POSH समिती पुण्यात कार्यरत असल्याने मागील अनेक महिन्यांपासून नाशिक युनिटला भेट देण्यात आलेली नव्हती, अशी कबुली चौकशीदरम्यान देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. यामुळे अंतर्गत देखरेख व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती
दरम्यान, पोलिस तपासात निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पीडितेला विशिष्ट धर्माची प्रार्थना आणि पोशाख स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे.

तपासात पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या लिंक आणि ऑनलाइन सामग्रीच्या माध्यमातून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या लिंकचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.

न्यायालयीन कोठडी
या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला 24 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल आणि पोलिस तपास यामुळे प्रकरण अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे.

Related to this topic: