Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Narayana E-Techno School

नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी

हिंगोली शहरातील नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारण्यात आलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड तातडीने वसूल करावा.


नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी

समाजसेवक मुनीर खान पठाण यांचे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना निवेदन

हिंगोली : हिंगोली शहरातील नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळेला आकारण्यात आलेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड तातडीने वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी समाजसेवक मुनीर खान पठाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना निवेदन सादर केले आहे.

या संदर्भात आरोग्यदूत तथा समाजसेवक मुनीर खान पठाण यांनी १६ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सन २०२४ मध्ये हिंगोली शहरात नारायणा ई-टेक्नो इंग्रजी शाळा सुरू करण्यात आली. संबंधित शाळेकडे यू-डायस (U-DISE) क्रमांक नसल्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.

सतत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली होती. त्यानंतरही शाळा सुरूच ठेवण्यात आल्याने १९ ऑगस्ट रोजी शाळेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला सील ठोकले होते.

मात्र, त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी शिक्षण विभागाने संबंधित शाळेला ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल न करताच मान्यता दिली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

दंडाची रक्कम वसूल न करता शाळेला मान्यता कशी देण्यात आली, याची चौकशी करून ३३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी समाजसेवक मुनीर खान पठाण यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Related to this topic: