Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड डॉक्टर लाईन ट्रॅफिक

नांदेडच्या 'डॉक्टर लाईन' परिसरात वाहतूक कोंडीचा तीव्र विळखा...

Nanded Doctor Line Traffic: शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा परिसर असलेल्या 'डॉक्टर लाईन'मध्ये दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक, रुग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन


नांदेडच्या डॉक्टर लाईन परिसरात वाहतूक कोंडीचा तीव्र विळखा

Nanded Doctor Line Traffic |

 

रस्त्यावर अनधिकृत वाहन पार्किंग करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

नांदेड (Nanded Doctor Line Traffic) : शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा परिसर असलेल्या 'डॉक्टर लाईन'मध्ये दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक, रुग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या नित्याच्याच त्रासातून सुटका करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आदी बनसोडे यांनी दिला आहे.

डॉक्टर लाईन (Nanded Doctor Line Traffic) हा शहरातील मुख्य वैद्यकीय हब असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आणि रुग्णवाहिकांची सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या काही काळापासून या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अनेकदा गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडतात. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कोंडीचा फटका केवळ रुग्णांनाच नाही, तर सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील खासगी नोकरदार यांनाही बसत असून त्यांचे रोजचे वेळापत्रक कोलमडले आहे.

डाॅक्टर लाईन परिसरातील खासगी रूग्णालयाने आपल्या रूग्णालयाची वाहन पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे नागरिक चक्क रस्त्यावरच आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करत असतात हेच वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण बनले आहे. तसेच डॉक्टर लाईन परिसरातील रस्ते ठिकठिकाणी खचले असून, खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. त्याचबरोबर मेडिकल दुकानांच्या आणि रुग्णालयांच्या बाहेर रस्त्यावरच होणारे अनधिकृत वाहन पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे. या भागात वाहनांची संख्या पाहता वाहतूक पोलिसांचे नियोजन अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.

या (Nanded Doctor Line Traffic) समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नांदेड महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे. डॉक्टर लाईन परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कडक दंडात्मक कारवाई करावी आणि वाहतूक नियोजन अधिक प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या  परिसरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांचे आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. जर प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर नागरिक, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदी बनसोडे यांनी दिला आहे.