Free Yoga Camp: नांदेडमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि स्वामी विवेकानंद योग केंद्राच्या संयुक्त आयोजनात विशेष नि:शुल्क योग शिबिर सुरू झाले आहे.
नांदेड (Free Yoga Camp) : वाढत्या लट्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि स्वामी विवेकानंद योग केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दीप नगर येथील हनुमान मंदिर परिसरात २६ मार्च ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ५ ते ७ या वेळेत हे नि:शुल्क शिबिर पार पडणार आहे.
या (Free Yoga Camp) शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगपटू किशनराव भवर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योग प्राध्यापक डॉ. मधुकर भारती उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचा रितसर प्रारंभ करण्यात आला.
या (Free Yoga Camp) कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य योग शिक्षिका अर्चना तोटावाड यांनी केले, तर सूत्रसंचालन सुरेश हाडोळीकर यांनी प्रभावीपणे सांभाळले. या प्रसंगी शरद सोडेगावकर, योगिता शिराढोणकर, सोपानराव काळे आणि राघव दन्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आनंद कोकाटे, मीरा स्वामी, अरुण घोडसे, सुरेखा भोसीकर, कोमल जाधव आणि भानुदास गिते हे परिश्रम घेत आहेत.
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि योग प्रेमींनी या (Free Yoga Camp) नि:शुल्क संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन योग वर्गातर्फे करण्यात आले आहे. वाढते वजन आणि त्यातून निर्माण होणारे आजार रोखण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.