Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

भाजपा युवा मोर्चा

नांदेडमध्ये उद्या भाजपा युवा मोर्चाचे 'जनआक्रोश आंदोलन

BJP Yuva Morcha: नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाने 'जनआक्रोश आंदोलन' आयोजित केले आहे. यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याच्या विरोधात मतदान


नांदेडमध्ये उद्या भाजपा युवा मोर्चाचे जनआक्रोश आंदोलन

BJP Yuva Morcha |

आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, शशिकांत पा. क्षीरसागर यांचे आवाहन

नांदेड (BJP Yuva Morcha) : 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी उद्या २३ एप्रिल  रोजी नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या वतीने भव्य 'जनआक्रोश आंदोलन' आयोजित करण्यात आले आहे. शहरातील आयटीआय चौक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे सकाळी १०:३० वाजता हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांनी केले आहे.

केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या ऐतिहासिक 'नारीशक्ती वंदन अधिनियम' (BJP Yuva Morcha) कायद्याच्या विरोधात मतदान करणाऱ्या पक्षांचा पर्दाफाश करणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. ​भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून आपली महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे."

​या (BJP Yuva Morcha) आंदोलनासाठी भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीजया ताई चव्हाण व भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या जनआक्रोश आंदोलनात महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चातर्फे त्यांनी केले आहे.

Related to this topic: