Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

वॉटर कुलर दान

रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान

Water cooler donation: नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर दान करण्यात आला. भीषण उन्हाळ्यात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने


रुग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर विथ कुलरचे दान

Water cooler donation |

नांदेड (Water cooler donation) : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वॉटर फिल्टर विथ कुलर दान करण्यात आला आहे. भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हॅपी क्लब व नांदेड शांतता कमिटी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ॲड. मोहम्मद कासिम वसीम बाबुसेठ तसेच हॅपी क्लबचे अध्यक्ष मोहम्मद शोहेब यांच्या सहकार्याने बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक ७ साठी हा वॉटर फिल्टर विथ कुलर रुग्णालयास प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, बालरोग विभागप्रमुख डॉ. किशोर राठोड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद देवसरकर, अधिसेविका बी. आर. मुदीराज यांच्यासह कर्मचारी व रुग्णनातेवाईक उपस्थित होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी समाजातील दाते, सामाजिक संस्था आणि सुजाण नागरिकांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रुग्णालयाला रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट लाभ मिळत असून अधिकाधिक दाते पुढे येऊन आरोग्यसेवेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देण्यात आलेल्या साहित्याची योग्य देखभाल व व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित वॉर्डाला देण्यात आल्या. तसेच रुग्ण व नातेवाईकांनी उपलब्ध सुविधांचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. या (Water cooler donation) उपक्रमासाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने राजरत्न केळकर व कुणाल महागडे (समाजसेवा अधीक्षक) यांनी संस्थेशी समन्वय साधून अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर फिल्टर उपलब्ध करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रुग्णालय प्रशासनाने दात्यांचे आभार मानून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Related to this topic: