Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

तहसीलदार संजय वारकड

एसआयआर कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार संजय वारकड यांनी सोनखेड येथे घेतली बैठक

Tehsildar Sanjay Warkad: भारत निवडणूक आयोगाच्या व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाप्रमाणे डॉ. सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ


एसआयआर कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार संजय वारकड यांनी सोनखेड येथे घेतली बैठक

Tehsildar Sanjay Warkad |

नांदेड (Tehsildar Sanjay Warkad): भारत निवडणूक आयोगाच्या व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाप्रमाणे डॉ. सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये एसआयआर मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. 

त्या अंतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये सोनखेड महसूल मंडळाचा समावेश होतो. येथील 37 बीएलओची व 4 सुपरवायझर्सची बैठक  तहसीलदार संजय वारकड (Tehsildar Sanjay Warkad) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय सोनखेड येथे घेतली. याप्रसंगी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार अशोक मोकले, सहाय्यक गटविकास अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी वानखेडे हजर होत्या. 

भारताची लोकशाही अधिक सक्षम पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांच्या माध्यमातून मतदाराचे गणनापत्र भरून घेण्याची प्रक्रिया दिनांक 30 जून पासून सुरू आहे. सदरील  गणना फॉर्म वाटप संकलन व डिजिटायझेशन चे काम सुरू आहे. बीएलओ मतदारांच्या घरी येतील तेव्हा मतदारांनी  या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड (Tehsildar Sanjay Warkad) यांनी केले.