Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड तहसील कार्यालय

नांदेड तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा

Nanded Tehsil Office: नांदेड तहसील कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना एका महिलेने महसूल अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना


नांदेड तहसील कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा

Nanded Tehsil Office |

 

वजीराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

नांदेड (Nanded Tehsil Office) : नांदेड तहसील कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना एका महिलेने महसूल अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना १५ जुलै रोजी घडली. या प्रकरणाची महसूल प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, संबंधित महिलेविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

​मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण मंडळाचे मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे यांनी महसूल न्यायालयातील प्रकरण क्र. आरटीएस-५९ (मौजे म्हळजा) मध्ये कायद्यानुसार निर्णय दिला होता. या निर्णयाच्या रागातून संबंधित महिलेने थेट तहसील कार्यालयात जाऊन शासकीय कर्तव्य बजावत असलेले मंडळ अधिकारी जोंधळे यांच्याशी वाद घालत गैरवर्तन केले आणि शासकीय कामात अडथळा आणला असा आरोप मंडळ अधिकाऱ्यांनी केला आहे.

​या घटनेनंतर महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, महसूल अधिकारी व कर्मचारी हे नेहमी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय देत असतात. जर एखाद्या पक्षकाराला दिलेल्या निर्णयाविषयी असहमती किंवा नाराजी असेल, तर त्यासाठी अपील, पुनर्विलोकन किंवा इतर कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत.​"अशा परिस्थितीत कायदा हातात घेणे, शासकीय कार्यालयात येऊन गैरवर्तन करणे, कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे किंवा शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. महसूल प्रशासन अशा कृत्यांचे कधीही समर्थन करणार नाही आणि ते सहनही केले जाणार नाही," असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

​नांदेड तहसिल कार्यालयात बुधवारी झालेल्या या घटनेमुळे तहसिल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.मात्र सदरिल महिलेने देखील मंडळअधिकाऱ्याविरोधात विविध प्रकारचे घाणरडे आरोप केल्याचे उपस्थितांनी सांगितले. नेमके यांचे खरे प्रकरण काय आहे.त्या महिलेने असे का केले ? याची माहिती मिळू शकली नाही.