Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; 'योग करा, निरोगी रहा'चा संदेश

आंतरराष्ट्रीय योग नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तारोडी खुर्द येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व तसेच 'निरोगी राहण्यासाठी योग्याचा अवलंब' करण्याचे आवाहन


आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योग करा निरोगी रहाचा संदेश

International Yoga Day |

नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तारोडी खुर्द

नागपूर/ तारोडी खुर्द (International Yoga Day) : नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तारोडी खुर्द अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "योग करा, निरोगी रहा – स्वस्थ भारत, सशक्त भारत!" या घोषवाक्याखाली आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

एकता प्रधानमंत्री आवास योजना, खासरा क्र. 63, प्रभाग क्र. 14 येथे आयोजित करण्यात आलेल्या या (International Yoga Day) कार्यक्रमाचे नेतृत्व शुभांगीताई उमरेडकर यांनी केले. योगाभ्यासाद्वारे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

या (International Yoga Day) कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष वीरू जमगडे, उपाध्यक्ष तथा सभापती निकेश कातुरे, सभापती संतोष तिजारे, प्रीतम बोकडे, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निदान, जिल्हा मंत्री रमेश चिकटे, कामठी तालुका अध्यक्ष सचिन घोडमारे, महिला अध्यक्ष नेहा ताई राऊत, भाजप बिडगाव अध्यक्ष गोपाल कुमेरिया, महामंत्री मोहन पत्रिकर, कामगार आघाडी महामंत्री कल्पना चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व विशद करत निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. योगामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

योगाच्या विविध आसनांचे प्रात्यक्षिक आणि सामूहिक योगाभ्यासाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. (International Yoga Day) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र घडविण्याचा संदेश देण्यात आला.

Related to this topic: