Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी महापालिका

चेंबूर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर परभणी महापालिका सतर्क

Parbhani Municipal Corporation: परभणी महापालिकाने चेंबूर दुर्घटनेच्या पृष्ठभूमीच्या खात्रीसाठी धोके देणाऱ्या इमारते, झाडे आणि फलकांचा तपासणी करण्याचा निर्णय घेतला.


चेंबूर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर परभणी महापालिका सतर्क

Parbhani Municipal Corporation |

 

धोकादायक इमारती, झाडे, फलकांच्या तपासणीचे निर्देश

परभणी (Parbhani Municipal Corporation) : मुंबईतील चेंबूर येथे वृक्ष कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर परभणी महापालिकाही सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिका हद्दितील धोकादायक इमारती, वृक्ष, जाहिरात फलक, पथदिवे तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणार्‍या बाबींची तातडीने तपासणी करुन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.  

कोणतीही दुर्घटना घडल्या नंतर त्या संदर्भातील कायदेशीर तरतूदी नियमांचे पालन आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची सखोल तपासणी केली जाते. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. याच अनुषंगाने वृक्ष प्राधिकरण समितीचे कामकाज दर महिन्याला नियमितपणे घेऊन धोकादायक वृक्षांची पाहणी, छाटणी अथवा आवश्यकतेनुसार हटविण्या बाबत निर्णय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

केवळ काही ठराविक विषयांना प्राधान्य न देता नागरीकांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व विषयांवर समान लक्ष केंद्रीत करुन नियोजनबध्द कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बाबींवर सतत लक्ष ठेवून संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

परभणी शहरातील विविध भागात धोकादायक इमारती, झाडे व इतर बाबी आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पावसाळ्यामध्ये धोकादायक झाडे, इमारती पडून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

Related to this topic: