Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मुंबई पोलिस संवेदनशीलता

मुंबई पोलिसात चिखलीच्या तरुणाची संवेदनशीलता..

Mumbai Police Sensitivity: पोलीस त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन एका रिक्षाला थांबवून त्या वृद्ध महिलेला बसवून देतो. तशी ही घटना अतिशय साधी वाटत असलीतरी, त्याच स्टॉपवर उभी एक तरुणी या प्रकाराचा व्हिडिओ शूट


मुंबई पोलिसात चिखलीच्या तरुणाची संवेदनशीलता

Mumbai Police Sensitivity |

वृद्ध महिलेला मदतीचा व्हिडिओ व्हायरल; मिळाले अवार्ड!

बुलढाणा (Mumbai Police Sensitivity) : एक ८० वर्षीय वृद्ध महिला एका स्टॉपवर ताटकळत उभी असते, अनेक रिक्षांना ती थांबवण्याचा प्रयत्न करते.. परंतु भरधाव वेगातील कोणतीही रिक्षा थांबत नाही. हा प्रकार कुठल्या वाहतूक पोलिसाच्या जेव्हा लक्षात येतो, तेव्हा तो पोलीस त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन एका रिक्षाला थांबवून त्या वृद्ध महिलेला बसवून देतो. तशी ही घटना अतिशय साधी वाटत असलीतरी, त्याच स्टॉपवर उभी एक तरुणी या प्रकाराचा व्हिडिओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर टाकते. अवघ्या काही तासातच तो व्हिडिओ १४ मिलियन्सच्यावर पोहोचतो. तोच व्हिडिओ  (Mumbai Police Sensitivity) मुंबई पोलीस त्यांच्या हँडलवर शेअर करते, अन् हा व्हिडिओ मुंबईभर वाऱ्यासारखा पसरतो. वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेऊन, त्या वाहतूक पोलिसाला बोलावून त्याला आव्हाने सन्मानित करतात. विशेष म्हणजे हा तरुण बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा, चंद्रनिलकांत किशोर सोनुने त्यांचे नाव. घटना आहे ती, मुंबईच्या बाबुलनाथ मंदिर गावदेवी येथील !

हाय मुंबईकर म्हणत सायली गावणकर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी अशी: ती म्हणते "आज मी तुम्हाला (Mumbai Police Sensitivity) मुंबई पोलिसांबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि माझ्या मोबाईलमध्ये कैद केली. काही लोक नेहमी पोलिसांवर टीका करतात. पण आपण सामान्य नागरिकांचा पोलिसांशी फारसा संबंध येत नाही. आपलं आयुष्य नोकरी, कुटुंब आणि रोजच्या प्रवासातच व्यस्त असतं. पण जेव्हा मुंबई पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल चंद्रनिलकांत सोनुने यांनी एका ८० वर्षांच्या आजीला माणुसकीच्या भावनेने मदत केली, तेव्हा मन अभिमानाने भरून आलं. त्या आजींना बाबुलनाथहून महालक्ष्मीला जायचं होतं. बराचवेळ त्या टॅक्सीचालकांना विनंती करत होत्या, पण कोणीही त्यांना घेऊन जाण्यास तयार नव्हतं. तेवढ्यात मुंबई पोलीस आणि मुंबई ट्रॅफिक पोलीस तिथे आले. त्यांनी तत्परतेने त्या आजींची मदत केली आणि त्यांना सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी सहकार्य केलं.

अशा क्षणांमुळेच मुंबई पोलिसांबद्दलचा आदर, विश्वास आणि अभिमान अनेक पटींनी वाढतो.
मनापासून सलाम!"

ही (Mumbai Police Sensitivity) घटना आहे, रविवार ११ जुलै रोजीची. बुलढाणा जिल्ह्यातील हा तरुण मुंबई वाहतूक शाखेत कार्यरत असून, त्यांच्या या संवेदनशील संवेदनशीलतेने व एका सामान्य तरुणीने शूट केलेल्या व्हिडिओमुळे ही घटना मुंबईभर चर्चेत राहिली!