Mumbai loan waiver Andolan: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने यापुर्वीच जाहीर
रविकांत तुपकर यांच्या खंबीर भूमिकेचे कौतुक; शेतकऱ्यांना दिलासा: विनायक सरनाईक
चिखली (Mumbai loan waiver Andolan) : मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने यापुर्वीच जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत सरकारने बदल करण्याची घोषणा अधिवेशनात केली असून या योजने अंतर्गत २०१९च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आता या (Mumbai loan waiver Andolan) कर्जमुक्ती योजनेत करण्याचा आणि त्यांना ५०हजारा वरुण दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर केल्याने चिखली तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या (Mumbai loan waiver Andolan) निर्णयामुळे शेतकरी चळवळीच्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आंदोलनाच्या लढ्याची आठवण करून दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक सरनाईक म्हणाले की, मुंबईतील आंदोलनामुळे शासनावर लोकदबाव निर्माण झाला आणि त्यातूनच हा निर्णय शक्य झाला. हा विजय केवळ एका संघटनेचा नसून राज्यातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या शेतकरी, कार्यकर्ते आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संघटनांचा आहे. चिखली तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या त्याग आणि संघर्षाचे हे यश असून, या निर्णयामुळे शेतकरी चळवळीला नवे बळ मिळाले आहे.
सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करत उर्वरित मागण्यांवरही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी संघटित राहून आपल्या हक्कासाठीचा लढा पुढेही कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. मुंबई आंदोलनानंतर झालेल्या या निर्णयामुळे चिखली तालुक्यासह राज्यभरातील शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, संघर्षातूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो, हा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.