Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

नदीत बुडून मृत्यू

वणा नदीच्या पात्रात बुडून तीन जणांचा मृत्यू

River Drowning Death: शेडगाव येथील वणा नदीत आंघोळीसाठी गेलेले तीन जण – अतुल किनकर, रिद्धिमा अतुल किनकर, आणि गुंजन मेश्राम – सकाळी बुडून मृत झाले. घटना नदीत स्नान करत असताना घडली.


वणा नदीच्या पात्रात बुडून तीन जणांचा मृत्यू 

River Drowning Death |

अधिक महिन्यानिमित्त आंघोळीसाठी आले असता वडिल, मुलीसह, मुलीच्या मैत्रीणीचा मृत्यू 

मांडगाव (River Drowning Death) : समुद्रपूर नजीकच्या शेडगाव येथील वणा नदीपात्रात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अधिक महिन्यानिमित्त आंघोळीसाठी गेले असता ही घटना शुक्रवारी २९ मे रोजी घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

मृतांमध्ये अतुल किनकर (वय ४०), त्यांची मुलगी रिद्धिमा अतुल किनकर (वय १५), मुलीची मैत्रीण गुंजन मेश्राम (वय १५) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त अतुल किनकर, मुलगी रिद्धीमा आणि मुलीची मैत्रीण गुंजन असे तीन जण सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास एमएच ३२ एएल ६५३९ क्रमांकाच्या दुचाकीने वणा नदी पात्रात स्नानाकरिता आले होते. नदीत स्नान करत असताना अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने (River Drowning Death) पाण्यात बुडाले. उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांचा शोध घेण्यास आले असता दुचाकी आणि कपडे दिसून आले. ही माहिती गावात कळताच गावकर्‍यांनी नदीपात्राकडे धाव घेतली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन, बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम राबवून तिघांचे मृतदेह (River Drowning Death) बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी आकाश अवथरे, तसीलदार कपिल हाटकर, उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायर, पोलिस निरीक्षक अनिल ठाकूर, समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर, गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी भेट दिली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.