Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा पाऊस

मोठ्या पावसाअभावी नदी-नाले कोरडेच; रिमझिम पावसाने पिकांना दिलासा!

Manora Rain:


मोठ्या पावसाअभावी नदी-नाले कोरडेच रिमझिम पावसाने पिकांना दिलासा

Manora Rain |

 

सलग पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी टंचाईची भिती

मानोरा (Manora Rain) : मानोरा तालुक्यात पावसाळ्याला जवळपास दोन महिने पूर्ण होऊनही समाधानकारक व सलग पाऊस झालेला नाही. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरींमुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी नदी-नाले, ओढे, तलाव आणि बोअरवेलमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  

 जून अखेरीस झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस, मूग यांची पेरणी केली. त्यानंतर पावसाने जवळपास 15 दिवस दडी मारल्याने पिके करपण्याची वेळ आली होती. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हलक्या पावसामुळे पिकांची वाढ पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  

 मात्र नदी-नाले, ओढे आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. भूजल पातळी वाढलेली नसल्याने विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची आवकही अत्यल्प आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. दररोज आभाळ भरून येत असले तरी रिमझिम पावसाशिवाय दमदार पाऊस होत नसल्याने शेतीचे नियोजन विस्कळीत होत आहे. खतांचा वापर, तणनाशकांची फवारणी आणि इतर शेतीकामांवरही त्याचा परिणाम होत आहे.  

येत्या काही दिवसात मुसळधार (Manora Rain) व सलग पाऊस झाला नाही, तर खरीपाबरोबरच रब्बी हंगामालाही फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.  
प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे आणि पाणी बचतीचे नियोजन तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.