Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

MNS Washim

वाशिम नर्सिंग कॉलेजमध्ये खंडणी प्रकरण; मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा

वाशिममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


वाशिम नर्सिंग कॉलेजमध्ये खंडणी प्रकरण मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा

MNS Washim |

परीक्षा केंद्रात घुसून प्रक्रियेत अडथळा, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

वाशिममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांकडे खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरून मनसेचे वाशिम जिल्हाध्यक्ष आणि इतर चार कार्यकर्त्यांविरुद्ध वाशिम शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील स्व. गोविंदराव देशपांडे कॉलेज ऑफ नर्सिंग येथे परीक्षा सुरू असताना मोठ्या प्रमाणात कॉपी होत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाने थेट वाशिम शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला.

महाविद्यालय प्रशासनाच्या तक्रारीनुसार, संबंधितांनी परीक्षा केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश केला, परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण केला तसेच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना धमकावत खंडणीची मागणी केली. या प्रकरणी मनसेचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजू किडसे, पदाधिकारी आकाश सुनील लोलप, उमेश टोलमारे आणि अन्य दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार वाशिम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: