Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

११२ क्रमांक गैरवापर

११२ क्रमांकावर विनाकारण फोन लावल्याने एकावर गुन्हा

112 Number Misuse: ११२ क्रमांकावर विनाकारण फोन करून लोकसेवकाला त्रास दिल्याप्रकरणी सेनगाव तालुक्यातील एका युवकावर नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


११२ क्रमांकावर विनाकारण फोन लावल्याने एकावर गुन्हा

112 Number Misuse |

हिंगोली (112 Number Misuse) : ११२ क्रमांकावर विनाकारण फोन करून लोकसेवकाला त्रास दिल्याप्रकरणी सेनगाव तालुक्यातील एका युवकावर नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४७ ते ८.३६ वाजेदरम्यान आरोपी बळीराम दत्तराव देवकर रा. देवकरवाडी ता. सेनगाव याने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर सात वेळा डायल करून 'माझ्यासोबत एक इसम भांडण करत आहे' अशी खोटी माहिती दिली. 

लोकसेवकाला त्रास होण्याच्या उद्देशाने ही खोटी माहिती दिल्याने नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे अंबादास ज्ञानबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर घटनेतील गुन्ह्याचा तपास सपोउपनी दिघाडे हे करत आहेत. आपत्कालीन ११२ क्रमांकाचा गैरवापर करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी गरज नसताना या क्रमांकावर फोन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.