Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बेपत्ता व्यक्ती मृत्यू

तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला..

Missing Person Death: नांदेडच्या कळमनुरी तालुक्यातील वरंगाफाट्यात एका नालेतील दुचाकी चालवणारा प्रशांत इंगळे यांचा मृतदेह तीन दिवसांपासून असलेल्या बेकायदा शोधनंतर आढळला.


तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला

Missing Person Death |

 

हदगाव जिल्ह्यातील नेवरी येथील भुसार व्यवसायिक व शेती करणारे प्रशांत इंगळे यांची पटली ओळख

आखाडा बाळापूर (Missing Person Death) : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या  नांदेड जिल्ह्यातील व्यक्तीचा मृतदेह कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा भागात रविवारी आढळून आला होता.डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सदर प्रकरणी रात्री अकस्मात मृत्यू नोंद करून पोलिस सदर प्रकरणाचा तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी- हदगाव तालुक्यातील सिमेवरील नेवरी ता.हदगाव येथील प्रशांत देवराव इंगळे (वय ३९वर्षे) हे भूसारचा व्यवसाय व शेती करतात हे ९ जुलै रोजी दुचाकीने  सायंकाळी नांदेडला जाण्यासाठी आखाडा बाळापूर मार्गाने निघाले होते परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत यामुळे त्यांचा नातेवाईकांनी शोध सुरू केला होता यात ते वारंगाफाट्यापर्यंत पोहोचले असल्याचे दिसून आले होते याबाबत नातेवाईकांनी ही बाब पोलिसांना सांगितले १० जुलै रोजी मिसींग नोंद करण्यात आली असता त्यांचा शोध सुरू असताना रविवारी दुपारी वारंगाफाटा हदगाव रस्त्यावर एका नालीमध्ये मृतदेह आढळला  कोणत्यातरी अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाला.

प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले याबाबत बिट प्रमुख बालाजी जोगदंड माहितीनुसार अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर व बालाजी गोणारकर, प्रशांत शिंदे, बालाजी जोगदंड, पिराजी बेले पोलिस पथकाने भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर करत आहेत.

Related to this topic: