Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणीत रविवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ना. मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

Minister Meghna Bordikar: देशासमोरील युद्धजन्य परिस्थिती, इंधन बचतीची गरज आणि पर्यावरण संवर्धन लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सप्तसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.


परभणीत रविवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ना मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

Minister Meghna Bordikar |

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्तसूत्रीला परभणीकरांनी प्रतिसाद द्यावा

परभणी (Minister Meghna Bordikar) : देशासमोरील युद्धजन्य परिस्थिती, इंधन बचतीची गरज आणि पर्यावरण संवर्धन लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सप्तसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Minister Meghna Bordikar) यांनी जिल्ह्यातील नागरिकांना रविवार १७ मे रोजी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन केले आहे.

मेघना बोर्डीकर (Minister Meghna Bordikar) यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, देशहितासाठी ऊर्जा व इंधन बचत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरात विविध स्तरांवर सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ‘वर्षा’ निवासस्थान ते मंत्रालय असा प्रवास दुचाकीवरून करून जनतेसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अनेक नागरिक सायकलचा वापर करून इंधन बचतीचा संदेश देत आहेत. याच भावनेतून जिल्ह्यातील नागरिकांनी येत्या रविवारी अत्यावश्यक असेल तरच दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा वापर करावा, असे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केले आहे. एक दिवस वाहनाला विश्रांती देऊन देशहितासाठी आपला छोटासा सहभाग नोंदवूया. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रप्रेम या भावनेतून प्रत्येक नागरिकाने नो व्हेईकल डे मध्ये सहभागी व्हावे, असेही त्या म्हणाल्या. परभणीकरांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा आणि राष्ट्रहितासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत, हे कृतीतून दाखवून द्यावे, असे आवाहनही मेघना साकोरे-बोर्डीकर (Minister Meghna Bordikar) यांनी केले आहे.