Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये दुर्गम रस्त्याचा फटका; प्रसूतीनंतर 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा गंभीर चर्चेचा विषय ठरला आहे.


चंद्रपूरमध्ये दुर्गम रस्त्याचा फटका प्रसूतीनंतर 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Maternal Death |

घोडनकप्पी गावात रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने संगीता गेडाम यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा आणि रस्त्यांवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर (Maternal Death) : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा गंभीर चर्चेचा विषय ठरला आहे. घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे वेळेत वैद्यकीय मदत पोहोचू न शकल्याने 25 वर्षीय संगीता गेडाम या महिलेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडनकप्पी हे गाव तेलंगणा सीमेजवळ वसलेले असून अतिशय दुर्गम भागात येते. या गावात पक्का रस्ता नसल्याने दळणवळणाची मोठी अडचण निर्माण होते. याच परिस्थितीत संगीता गेडाम यांची आठव्या महिन्यात घरातच प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने तातडीने आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली.

मात्र, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि ग्रामीण रस्त्यांच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने या प्रकरणावर माहिती देताना सांगितले की, संबंधित महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी केली जात होती. तसेच घोडनकप्पी गावात रस्ता नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला आधीच माहेरी जाण्याचा किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, महिलेने माहेरी जाण्यास किंवा आरोग्य केंद्रात स्थलांतर करण्यास नकार दिला होता, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

आठव्या महिन्यातच घरी प्रसूती झाल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related to this topic: