Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

टाईम रेझिस्टन्स थिअरी

बुलढाण्याच्या बालवैज्ञानिकाची जागतिक भरारी! ७ वीच्या विद्यार्थ्याच्या 'टाईम रेझिस्टन्स थिअरी'ला आंतरराष्ट्रीय मान्यता

Time Resistance Theory: भौतिकशास्त्रातील अत्यंत क्लिष्ट आणि आजवर जगातील मोठ्या शास्त्रज्ञांनाही न सुटलेल्या 'क्वांटम ग्रॅव्हिटी' (Quantum Gravity) या समस्येवर संशोधन करून बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्र.


बुलढाण्याच्या बालवैज्ञानिकाची जागतिक भरारी ७ वीच्या विद्यार्थ्याच्या टाईम रेझिस्टन्स थिअरीला आंतरराष्ट्रीय मान्यता

Time Resistance Theory |

 

पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील निधीश सोळंकी आणि अर्णव खापर्डे यांचे 'क्वांटम ग्रॅव्हिटी'वर महत्त्वपूर्ण संशोधन;
युरोपियन व्यासपीठ 'झेनोडो' आणि 'IJFMR' कडून गौरव

चिखली (Time Resistance Theory) : भौतिकशास्त्रातील अत्यंत क्लिष्ट आणि आजवर जगातील मोठ्या शास्त्रज्ञांनाही न सुटलेल्या 'क्वांटम ग्रॅव्हिटी' (Quantum Gravity) या समस्येवर संशोधन करून बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राने जागतिक विज्ञान पटलावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. पुणे येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी निधीश वसंत सोळंकी आणि त्याचा सहकारी अर्णव देविदत्त खापर्डे यांनी मांडलेला 'टाइम रेझिस्टन्स थिअरी' (Time-Resistance Theory) हा क्रांतिकारी संशोधनात्मक सिद्धांत जागतिक स्तरावर अत्यंत आदराने स्वीकारला गेला आहे.

​या दोन्ही बालवैज्ञानिकांचे हे संशोधन युरोपमधील अत्यंत प्रतिष्ठित अशा 'झेनोडो' (Zenodo) या संशोधन व्यासपीठावर आणि 'इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च' (IJFMR) मध्ये (Volume 8, Issue 4, July-August 2026, Paper ID: 83722) अधिकृतपणे प्रकाशित झाले आहे. या (Time Resistance Theory) आंतरराष्ट्रीय जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर तब्बल ९.२४ इतका असून, अशा मानाच्या जागतिक व्यासपीठावर अवघ्या १२-१३ व्या वर्षी शोधनिबंध प्रसिद्ध होणे ही देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.

​काय आहे 'टाईम रेझिस्टन्स थिअरी'?
​जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी मांडलेला 'सामान्य सापेक्षता सिद्धांत' (General Relativity) आणि सूक्ष्म कणांच्या अभ्यासासाठीचा 'क्वांटम सिद्धांत' (Quantum Mechanics) यांचा एकत्रित मेळ घालणे हे आधुनिक भौतिकशास्त्रासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. यालाच वैज्ञानिक परिभाषेत 'क्वांटम ग्रॅव्हिटी'चे कोडे म्हटले जाते.

​निधीश आणि अर्णव या बालवैज्ञानिकांच्या जोडीने आपल्या 'Time-Resistance Theory' च्या माध्यमातून या समस्येकडे पाहण्याचा अत्यंत अभिनव आणि गणितीय दृष्टिकोन मांडला आहे. त्यांच्या या शोधनिबंधात गुरुत्वाकर्षण आणि काळाची गती (Temporal Scaling) यातील परस्पर संबंधांचे अत्यंत क्लिष्ट विश्लेषण मांडण्यात आले आहे.

​कोलाराच्या सुपुत्राने उंचावला जिल्ह्याचा मान
​भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणारा निधीश सोळंकी हा बुलढाणा जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर भगवंताची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलारा (ता. चिखली) येथील मूळ रहिवासी आहे. तो कोलारा येथील नामांकित उद्योजक तथा 'निकोस प्रा. लिमिटेड'चे संचालक वसंत सोळंकी आणि डॉ. कविता सोळंकी यांचा सुपुत्र आहे. अत्यंत ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुलाने थेट युरोपियन वैज्ञानिक व्यासपीठापर्यंत घेतलेली ही झेप महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारी आहे.

​सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
​वयाच्या अवघ्या सातवीत असताना विज्ञानाच्या अत्यंत गहन विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या निधीश सोळंकी आणि अर्णव खापर्डे यांच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीबद्दल पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक, बुलढाणा जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. या बालवैज्ञानिकांची ही झेप भविष्यातील महान संशोधकाची नांदी मानली जात आहे.

Related to this topic: