Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ट्रक-दुचाकी अपघात

ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी धडकून बहिण भाऊ झाले जखमी

Truck-Bike Accident: ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने वारंगा हदगाव रस्त्यावर दुचाकीच्या दोन सदस्यांना गंभीर जख्म घेतले. पोलिसने ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केले.


ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी धडकून बहिण भाऊ झाले जखमी

Truck-Bike Accident |


वारंगा हदगाव रस्त्यावर घडलेली अपघाताची घटना 

आखाडा बाळापूर (Truck-Bike Accident) : कळमनुरी तालुक्यातील वारंगा ते हदगाव रस्त्यावर ट्रक चालकाने वाहनास अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणारी दुचाकी ट्रकवर आदळून दोघे बहिण भाऊ जख्मी झाले याबाबत आज गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  २३जून रोजी साडेचार वाजता वारंगा ते हदगाव रस्त्यावर बरड शेवाळा येथील रोहीत कुमार प्रकाश शिखरे हे बहिणीसह दुचाकी एम एच २६  बीवाय ७८१३ यावर बसून नांदेड येथून बरडशेवाळा जात असताना ट्रक एम एच २६ सीएच ०९३७ च्या चालकाने  त्याच्या ताब्यातील वाहन एसटी बसला ओव्हरटेक करताना  अचानक ब्रेक लावल्याने सदर दुचाकी ट्रकवर आदळून दोघे बहिण भाऊ पडल्याने भाऊ गंभीर जख्मी झाला बहीण ही जख्मी झाली. याबाबत (Truck-Bike Accident) आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात सदर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख बालाजी जोगदंड पुढील तपास करीत आहेत.

Related to this topic: