Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पालक मारहाण प्रकरण

टि.सी. काढण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण केल्या प्रकरणी संस्था चालकासह चौघावर गुन्हा दाखल

Parent assault case: सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी बी.फार्मसी महाविद्यालयात टि.सी. काढण्याच्या कार्यक्रमात गेल्या मुलाला त्यांचे पालक मारत जखमी


टिसी काढण्यासाठी गेलेल्या पालकास मारहाण केल्या प्रकरणी संस्था चालकासह चौघावर गुन्हा दाखल

Parent assault case |

हिंगोली (Parent assault case) : सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थिनीची टी.सी. काढण्याकरीता गेलेल्या पालकास लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी संस्था चालकासह चौघावर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा खु. येथील गजानन बाबाराव जाधव यांच्या मुलीने सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी.फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. परंतु तिला या महाविद्यालयात शिकावयाची इच्छा नसल्याने १० जुलै रोजी विद्यार्थिनीसह तिचे वडील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बी.फार्मसी महाविद्यालयात टि.सी. काढण्याकरीता आले होते.

यावेळी महाविद्यालयात त्यांना टी.सी. देण्याकरीता नकार दर्शविण्यात आल्याने वाद विवादाची घटना घडली होती. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या प्रसंगी गजानन जाधव यांना प्रारंभी शिवीगाळ करून थापड बुक्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी १३ जुलैला सेनगाव पोलिस ठाण्यात गजानन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्था चालक भास्कर बेंगाळ, मनोहर बेंगाळ, अभिषेक बेंगाळ यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राजूदास जाधव हे करीत आहेत.

मारहाणीची व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
या प्रकरणात टि.सी. काढण्याकरीता गेलेल्या पालकास मारहाण केल्या बाबतचा व्हिडीओ मागील काही दिवसापासून सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.