Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

बुलेट दुचाकी अपघात

बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एक गंभीर

Bullet Bike Accident: १३ जुलै सायंकाळी पाथरीच्या तालुक्यातील बुलेट चालकाने दुसऱ्याचे दुचाकीवर धडक दिली. अपघातामुळा एका दुचाकीवर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि गम्भीर जखम झाली.


बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू एक गंभीर

Bullet Bike Accident |

 

पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा पाटीजवळील अपघात

परभणी (Bullet Bike Accident) : पाथरी तालुक्यातील भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल चालकाने दुसर्‍या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १३ जुलै रोजी सायंकाळी सात ते साडे सात या दरम्यान पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा पाटीजवळ घडली. या प्रकरणी १४ जुलैला बुलेट चालकावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुखदेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. १३ जुलै रोजी सायंकाळ च्या सुमारास फिर्यादीचे भाऊ नामदेव रंगनाथ जाधव, चुलता रावसाहेब दासू जाधव हे (Bullet Bike Accident) दुचाकीवरुन बाभळगाव फाटा येथे काही सामान आणण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या वेळी संबंधितांचा अपघात झाला. नामदेव जाधव व रावसाहेब जाधव यांना पाथरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून नामदेव जाधव यांना मृत घोषीत केले तर रावसाहेब जाधव यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बुलेट मोटारसायकल चालक बळीराम रंगनाथ रणेर याच्यावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related to this topic: