Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

विश्रोळी पूर्णा प्रकल्प

विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची 2 दरवाजे उघडली..

Vishroli Purna Project: विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढ, प्रकल्पातून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रतिवसेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे.


विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची 2 दरवाजे उघडली

Vishroli Purna Project |

 

2 दरवाजे दहा सेंटीमीटर उघडून नदी पात्रात 15.50 प्रति सेकंद विसर्ग सुरू 

चांदूर बाजार (Vishroli Purna Project) : मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून धरणामध्ये ७१.१९ टक्के जलसाठा झाला असल्याने ८ जुलै ला सायंकाळी ४ वाजता प्रकल्पाची  २ दारे १० सेमीने उघडण्यात आली असून प्रकल्पातून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रतिवसेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील (Vishroli Purna Project) पुर्णा मध्यम प्रकल्पात दिनांक ८जुलै रोजी  सकाळी ०७:०० वाजता जलाशय पातळी ४४९.५८ मी., उपयुक्त पाणी साठा  २५.१८ द.ल.घ.मी. व टक्केवारी ७१.१९% ईतका पाणीसाठा झालेला असल्याने त्या अनुषंगाने  ८जुलै रोजी ४.०० वाजता प्रकल्पातुन नदी पात्रात १५.५० घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे पूर्णा प्रकल्प उपअभियंता यांनी दिलेल्या सूचनेवरून  सर्व यंत्रणांनी नोंद घेण्यात यावी व त्या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे कळविण्यात आले आहे.

प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तालुक्यातील (Vishroli Purna Project) पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कुणीही उतरू नये, जनावरे सुरक्षित ठिकाणी न्यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे असे आवाहन पुर्णा मध्यम प्रकल्प उपअभियंता सागर अलटकर यांनी केले आहे.