Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलिस बदली

हिंगोलीचे पोलिस अधिक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांची नांदेडला बदली

Hingoli Police Transfer: जिल्हा पोलिस अधिक्षकपदी डॉ. निलाभ रोहन यांची अवघ्या सहा महिन्यापुर्वी नियुक्ती  झाली असताना २३ जूूनला गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.


हिंगोलीचे पोलिस अधिक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांची नांदेडला बदली

Hingoli Police Transfer |

 

नुतन पोलिस अधिक्षकपदी श्रेणीक लोढा यांची  नियुक्ती
अवघ्या सहा महिन्यात पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांची बदली

हिंगोली (Hingoli Police Transfer) : जिल्हा पोलिस अधिक्षकपदी डॉ. निलाभ रोहन यांची अवघ्या सहा महिन्यापुर्वी नियुक्ती  झाली असताना २३ जूूनला गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. ज्यामध्ये डॉ.निलाभ  रोहन यांची नांदेड पोलिस अधिक्षक  पदी नियुक्ती केली तर त्यांच्या  जागेवर खामगाव- बुलढाणा येथील अप्पर पोलिस अधिक्षक  श्रेणीक लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नगर पालिकाच्या निवडणुकी दरम्यान मतमोजणी झाल्यानंतर तत्कालीन (Hingoli Police Transfer) पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या जागेवर छत्रपती संभाजी  नगर येथून आलेले जिल्हा पोलिस अधिक्षक डॉॅ. निलाभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली  होती. २३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी पदभार स्विकारला होता. पदभार  स्विकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसह अवैध धंद्यावर चांगलीच वचक निर्माण केली होती. अवैध धंदे मोठ्या प्रमाणे बंद करण्यात आले होते.

२३ जून मंगळवार रोजी राज्यातील वरिष्ठ  पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले. ज्यामध्ये (Hingoli Police Transfer)  पोलिस अधिक्षक  डॉ. निलाभ  रोहन यांची नांदेडला बदली करण्यात आली तर त्यांच्या जागेवर खामगाव-बुलढाणा  येथील श्रेणीक लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.श्रेणीक लोढा हे  २०१८ च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे  भारतीय पोलिस  सेवा  अधिकारी आहेत. पोलिस सेवेत येण्याअधी   त्यांनी  ससुन रुग्णालय (पुणे) आणि मेळघाटच्या  आदीवासी भागात वैद्यकिय सेवा  केली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र  राज्यपालांचे परिसहाय्यक म्हणूनही काम पाहिले आहे.