Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

गंगाखेड बस

परभणीतील दारुड्या प्रवाशाने घेतला चक्क बसचा ताबा; प्रवाशांत उडाली खळबळ

Gangakhed Bus: बस स्थानकातील ग्रामीण भागात धावणाऱ्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या बसच्या चालक सिटवर बसून एका दारुड्या प्रवाशाने चक्क बसचा ताबा घेत बस सुरु करून नेण्याचा प्रयत्न


परभणीतील दारुड्या प्रवाशाने घेतला चक्क बसचा ताबा प्रवाशांत उडाली खळबळ

Gangakhed Bus |

कर्तव्यावर हजर होमगार्ड यांच्यामुळे मोठा अनर्थ टळला
परभणीच्या गंगाखेड बस स्थानकातील प्रकार...!

परभणी/ गंगाखेड (Gangakhed Bus) : बस स्थानकातील ग्रामीण भागात धावणाऱ्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या बसच्या चालक सिटवर बसून एका दारुड्या प्रवाशाने चक्क बसचा ताबा घेत बस सुरु करून नेण्याचा प्रयत्न करताच येथे कर्तव्यावर हजर होमगार्डनी त्यास तात्काळ पकडून ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना रविवार २ ऑगस्ट रोजी दुपारी १:२० वाजेच्या सुमारास गंगाखेड बस स्थानकात घडली आहे. या घटनेने प्रवासी वर्गात मात्र चांगलीच खळबळ उडाली होती.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड येथून कोद्री मार्गे किनगावकडे दुपारी १:३० वाजता धावणाऱ्या बसचे चालक बाबुराव फड यांनी एमएच ०६ एस ८७७० ही किनगाव जाणारी बस रविवार २ ऑगस्ट रोजी दहा मिनिटांपूर्वी दुपारी १:२० वाजेच्या सुमारास बस स्थानकातील ग्रामीण भागात जाणाऱ्या बस थांब्यावर लावून चालक फड वाहतूक नियंत्रण कक्षात बसची नोंद करण्यासाठी गेले असता या बसमधून प्रवास करणाऱ्या एका दारुड्याने प्रवाशाने बस मध्ये चालक नसल्याचा गवगवा करत चक्क बस चालकाच्या जागेचा ताबा घेत बस सुरु करून बस गावाकडे नेण्याचा प्रयत्न करताच बस मधील अन्य प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने येथे कर्तव्यावर हजर असलेल्या गृहरक्षक दलाचे जवान होमगार्ड शिवाजी टोले, होमगार्ड विश्वनाथ सातपुते व होमगार्ड मंगेश आंधळे आदींनी मोठ्या शिताफिने बसमध्ये चढून बस सुरु करून चालकाच्या सिटवर बसून बस पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशास पकडून ताब्यात घेताच गंगाखेड आगारात उपस्थित चालक व वाहकांनी मोठी गर्दी करत त्यास पोलीस ठाण्यात हजर केल्याने मोठा अनर्थ टळला व बसमध्ये बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही सुटकेचा श्वास सोडला. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या संदर्भात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.