Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

मुख्याध्यापिका नम्रता बेले

बियाणी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका नम्रता बेले यांची सीबीएसई जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती

Principal Namrata Bele: बियाणी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका नम्रता बेले यांची सीबीएसई बोर्ड, पुणे यांच्याकडून हिंगोली जिल्ह्याच्या सीबीएसई बोर्डाच्या जिल्हा  समन्वयक पदी नियुक्ती


बियाणी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका नम्रता बेले यांची सीबीएसई जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती

Principal Namrata Bele |

 

शिक्षक वर्गातून अभिनंदन

हिंगोली (Principal Namrata Bele) : येथील बियाणी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका नम्रता बेले यांची सीबीएसई बोर्ड, पुणे यांच्याकडून हिंगोली जिल्ह्याच्या सीबीएसई बोर्डाच्या जिल्हा  समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची आणि नेतृत्वाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.  डिस्ट्रिक्ट कोऑर्डीनेटर म्हणून सौ. नम्रता बेले या हिंगोली जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळांमधील शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, परीक्षा आयोजन, शिक्षक प्रशिक्षण आणि बोर्डाच्या विविध उपक्रमांचे समन्वय पाहणार आहेत. 

मुख्याध्यापिका नम्रता बेले (Principal Namrata Bele) यांच्या या नियुक्तीबद्दल बियाणी इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.  या नियुक्तीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मान वाढला असून जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शाळांना सीबीएसईच्या नवीन उपक्रमांचा अधिक लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.